Posts

Image
आदित्यमध्ये अहंकार नाही, धीरजमध्ये विलासरावांची छाप, रोहित, अदिती, विश्वजीत यांचेही कौतूक नागपूर: नागपुरचे हिवाळी अधिवेशन यंदा विविधांगाने वैशिष्ट्य़पूर्ण आहे. सभागृहात युवा तडफदार आमदारांची मांदियाळी आहे. युवा आमदारांमुळे सभागृहाला वगळीच शोभा आली आहे तसेच या युवा नेतृत्वाकडून अनेकांच्या अपेक्षादेखील आहेत. या युवा नेतृत्वावर अनौपचारीक भाष्य करताना राष्ट्रवादीचे नेते आमदार अजित पवार यांनी त्यांच भरभरून कौतूक केलं आहे. आदित्य ठाकरे – आदित्य ठाकरे यांच्याविषयी बोलताना अजित पवार म्हणाले, कोणतीही “मिटिंग असली आणि कोणीही सीनिअर आले तर आदित्य लगेच खुर्ची खाली करुन देतो, मी मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे असं वागणं नाही, अहंकार नाही” असे पवार यांनी सांगितले. धीरज देशमूख – “धीरज बोलताना तर मला काल विलासराव देशमुख बोलत आहेत का असं वाटलं, बोलण्याची स्टाईल, शब्दफेक अगदी हुबेहूब विलासरावच वाटत होते, असं अजित पवार म्हणाले. रोहित पवार – आमचा रोहित पण चांगला आहे, अदिती तटकरे, विश्वजीत कदम यंग टीम चांगलं करत आहे”, असं म्हणत अजित पवारांनी युवा आमदारांचं कौतुक केलं. अजि...